ओडिशा रसगुल्ल्याला मिळाला जीआय टॅग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

अखेर ओडिशातील रसगुल्ल्याला भौगोलिक संकेतांक (जीओग्राफिकल इंडिकेशन टॅग) मिळाला आहे. चेन्नई येथील भौगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयाने तसे प्रमाणपत्रही दिले असून या प्रमाणपत्राची वैधता 22 फेब्रुवारी 2028पर्यंत असणार आहे. 2015 सालापासून ओडिशा आणि पश्चिम बंगलमध्ये ‘रसगुल्ला’ या मिठाईच्या भौगोलिक हक्कावरून वाद सुरू आहे. ही दोन्ही राज्ये रसगुल्ला आमचाच असे म्हणत आहेत.