Astrology । Horoscope । 28 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – मंगळवारी रोहिणी नक्षत्र दुपारी 1.30 पर्यंत आहे त्यानंतर मृग नक्षत्र आहे. तसेच सिद्ध योग आहे. कार्तिक कृष्ण प्रतिप्रदा आहे. पंचागानुसार आजचा शुभ दिवस आहे. आज मेष, वृषभ, कर्क, कन्या, मकर आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – दुपारी 3.00 ते 4.30 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस फलदायी असेल. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानात होत असल्याने आर्थिक समस्या संपण्याचे योग आहेत. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबींवर कुटुंबियांशी चर्चा केल्यास त्याचा फायदा होईल. घरातील ज्येष्ठांचे चांगले सहकार्य मिळणार आहे. जोडीदाराशी मतभेद टाळावे, अन्यथा नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात कामे पूर्ण होत नसल्याने अस्वस्थता वाढेल. पैशांची आवक समाधानकारक असल्याने व्यवहारांना गती मिळेल. कोणाशीही अनावश्यक वादात अडकू नका. रागावर नियंत्रण ठेवल्यास आजचा दिवस चांगला जाणार आहे.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस चांगला ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानात होत असल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. कार्यक्षेत्रातील वातावरण उत्साहाचे असेल. घरातील वातावरणही आनंदाचे असेल. सुख-समृद्धीत वाढ झाल्याने तुम्ही आनंदी असाल. मात्र, आताच बचतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. नवीन योजनांना गती मिळेल. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याने वातावरण प्रसन्न राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. मात्र, त्यासाठी घरातील ज्येष्ठांचा सल्ला फायद्याचा ठरेल.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानात होणार असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. उधारउसनावरा किंवा कर्ज घेणे टाळावे लागेल. कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा कामाच्या व्यापात अडकून पडाल. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवावा. घराबाहेर कोणत्याही वादविवादात पडू नका, अन्यथा तुमचे काही नुकसान होऊ शकते. आजच्या दिवसात गुंतवणुकीचा निर्णय विचार करूनच घ्यावा. घरातील वातावरण समाधानकारक असेल.

कर्क
कर्क राशीला आज नशीबाची साथ मिळणार आहे. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानात होत असल्याने अचानक लाभाचे योग आहेत. व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. जुन्या योजनांचा चांगला लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात कामाकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कामात कोणत्याही त्रुटी ठेऊ नका किंवा कामे पुढे ढकलू नका, अन्यथा नंतर कामाडा बोजा वाढणार आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानात होत असल्याने कामांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आजचा दिवस फायद्याचा असला तरी व्यापारात आणि कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. उत्पन्नात वाढ होण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने पुढे जाल. घाईगडबडीत कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते. कार्यक्षेत्रात सहकार्याचे वातावरण असेल. घरातील वातावरणही समाधानकराक असेल.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानात होणार असल्याने नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना आज चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात वरिष्ठांच्या सल्ल्याचा फायदा होणार आहे. मनात नकारात्मक विचार आणू नका, अन्यथा त्याचा परिणाम कामावर होऊ शकतो. आज उत्साही असल्याने कामे वेळेत पूर्ण कराल. कोणतेही व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे. कुटुंबियांसाठी वेळ काढल्यास घरात प्रसन्न वातावरण असेल.

तूळ
तूळ राशीला आज आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानात होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढला तरी सहकाऱ्यांची साथ मिळणार आहे. मात्र, विनाकारण दगदग, धावपळ केल्यास मनस्ताप वाढणार आहे. आजचा दिवस विवेकाने आणि शहाणपणाने पुढे जाण्याचा आहे. घाईगडबडीत आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.अन्यथा आजार बळावण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या सोडल्यास आजचा दिवस समाधानाचा असेल.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानात होत असल्याने जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना फायद्याचा दिवस आहे. आज दांपत्य जीवन आनंदी राहील तसेच गैरसमज आणि दुरावा दूर होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठेत आणि मानसन्मानात वाढ होणार आहे. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना जनतेचा पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची साथ मिळणार आहे. जोडीदाराच्या सहकार्याने घरातील वातावरण प्रसन्न असेल.

धनू
धनू राशीला आजचा दिवस काळजी घेण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानात होत असल्याने कामाचा व्याप वाढणार आहे. तसेच हितशत्रू कारवाया करतील. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाता येईल. मात्र, कोणत्याही शब्दांत अडकू नका. घरातही खेळीमेळीचे वातावरण असेल. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढला तरी कौशल्याने कामे वेळेत पूर्ण होतील, त्यामुळे समाधान मिळेल. परिश्रम आणि सहकार्याने पुढे जाणे हिताचे ठरेल. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. स्थैर्याची भावना दृढ होईल. बऱ्याच दिवसापासून रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घरात समाधानाचे वातावरण असेल.

मकर
मकर राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण पंचम स्थानात होत असल्याने शुभसमाचार मिळण्याचे योग आहेत. मुलांसोबत आज वेळ घालवल्यास मुले आनंदित होणार आहेत. त्यामुळे घरातही चांगले वातावरण असेल. दिवसभर धावपळ झाल्याने थकवा जाणवणार आहे. जोडीदाराशी भांडण करणे टाळा. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळणार आहे. आज उत्पन्न आणि खर्चाचे बजेट तयार केले पाहिजे, अन्यथा खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. विनाकारण वाद टाळल्यास घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस सकारात्मक असेल. चंद्र चतुर्थ स्थानात भ्रमण करत असल्याने घरासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. अचानक लाभाचे योग आहेत. आजचा दिवस सुख-समृद्धीचा असला तरी कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. घरातील कामे आणि कुटुंबियांच्या आजारपणामुळे चिंता वाढणार आहे. मात्र, घरात वाद टाळणे गरजेचे आहे. भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. घरासाठी काही खरेदी करण्याचे योग आहेत. सहलीला किंवा प्रवासाला गेलात तर काळजी घेण्याची गरज आहे. घरातील व्यक्तींच्या प्रकृतीमुळे आजच्या दिवसात तणाव राहण्याची शक्यता आहे.

मीन
मीन राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानात होत असल्याने मानसन्माचे योग आहेत. तसेच अनेक योजना दृष्टीपथात येतील. तसेच एखादे नवे काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. रखडलेल्या कामांना गती दिल्यास त्या पूर्ण होणार आहेत. दिवस उत्साहाने कामे पूर्ण करण्याचा आहे. कार्यक्षेत्रात काही जबाबदाऱ्या वाढू शकतात, तरीही त्या तुम्ही पूर्ण कराल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मनात प्रसन्नता असेल. जुना मित्र किंवा नातेवाईकांची भेट होण्याचे योग आहेत.