Astrology । Horoscope । 4 December कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – सोमवारी मघा नक्षत्र आहे. तसेच वैधृती योग आहे. कार्तिक कृष्ण सप्तमी आहे. पंचागानुसार आज सामान्य दिवस आहे. आज मेष, मिथुन,कर्क, सिंह, तूळ आणि, धनू या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – सकाळी 7.30ते 9.00 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा चांगला दिवस असेल. चंद्राचे भ्रमण पंचम होत असल्याने शुभ समचार मिळण्याचे योग आहेत. नोकरदारांसाठीही लाभदायक दिवस आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी ताळमेळ आणि समन्वय ठेवल्यास कामे झटापट पूर्ण होतील. हातात पैसे येण्याची शक्यता असल्याने जमा-खर्चाचे बजेट बनवल्यास त्याचा बचतीसाठी फायदा होईल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद असल्यास ते दूर होतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरणही आनंदी असेल.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस चांगला ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानातून होत असल्याने घरासाठी जास्त वेळ काढावा लागेल. कोणताही गुंतवणूक करताना सावधतेने निर्णय घ्या, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे. घरातील कामांकडे पूर्ण लक्ष द्या, अन्यथा वादविवाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासह संशोधनात आवड निर्माण होणार आहे. घरातील वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण चांगले असेल.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानात होणार असल्याने मानसन्मानाचे योग आहेत. कुटुंबात बराच काळापासून सुरू असलेल्या समस्येवर चर्चेतून मार्ग निघणार आहे. सर्वांशी आदराने आणि संयमाने वागा. कार्यक्षेत्रात कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे कामे करा. आर्थिक नियोजनाची चिंता कमी होणार आहे. प्रगतीतील अडथळे दूर होणार असल्याने घरातही उत्साहाचे वातावरण असेल.

कर्क
कर्क राशीला आज लाभदायक दिवस आहे. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानातून होत असल्याने अचनाक लाभाचे योग आहेत. घरातील मालमत्तेचे प्रश्न सुटण्यास सुरुवात होणार आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायद्याचा असेल. आर्थिक घडामोडींना वेग मिळेल. काही वाद विवाद चर्चेतून सुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा. कार्यक्षेत्रात कामाकडे लक्ष केंद्रीत करा. मालमत्ता खरेदी करताना त्यातील कायदेशीर बाबी तपासून घ्याव्यात. घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानात होत असल्याने अनेक समस्या सुटणार आहेत. केलेल्या सृजनात्मक कामांचे कौतुक होणार आहे. मात्र, कोणाशीही बोलताना भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही मोठी उद्दिष्टे दृष्टीपथात येतील. मात्र, मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी खर्च होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढणार आहे. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्याचा फायदा होणार आहे. अविवाहितांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येण्याचे योग आहेत. सध्याच्या काळात बचतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाणीत गोडवा ठेवल्यास घरातील वातावरण समाधानाचे असेल.

कन्या
कन्या राशीला आज वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानात होत असल्याने अचानक काही खर्च उभे ठाकतील. कोणालाही न दुखावता सोबत घेत काम केल्यास कार्यक्षेत्रात त्याचा फायदा होणार आहे. व्यवसायात कोणताही धोका पत्करणे टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच कोणत्याही कायदेशीर बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. दीर्घकाळ रखडलेली काही कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत लहान पिकनिकचा बेत ठरण्याची शक्यता असल्याने घरातील वातावरण उत्साहाचे असेल.

तूळ
तूळ राशीला आजचा दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानात होत असल्याने अचानक लाभाचे योग आहे. व्यवसायवाढीच्या योजनांना यश मिळण्याचे योग आहेत. आजचा दिवसात संपत्तीत वाढ होण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. मात्र, वादविवाद टाळणे हिताचे होणार आहे. सरकारी योजनेवर लक्ष केंद्रित करत कागदपत्रांच्या पूर्ततेकडे लक्ष द्या. लहान प्रवास फायद्याचे ठरणार आहेत. भावनेवर संयम ठेवल्यास घरातील वातावरण शांत राहण्यास मदत होणार आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानात होत असल्याने कामाचा व्याप वाढणार आहे. कामानिमत्त प्रवास होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा होणार आहे. कामात काही अडथळे आले असतील तर कुटुंबियांच्या मदतीने ते दूर करता येतील. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन योजनांना गती मिळणार आहे. व्यवसायिकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. कार्यक्षेत्रातही उत्साहाचे वातावरण असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. त्यामुळे घरातील तणाव कमी होण्यास मदत होणार आहे.

धनू
धनू राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानातून होत असल्याने नशिबाची साथ मिळणार आहे. कोणत्याही कामात हट्टीपणा आणि घाई करू नका. विचारपूर्वक पुढे जा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी कमी होणार आहेत. आजचा दिवस प्रगतीचा असेल. कार्यक्षेत्रात एखादी चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. यशाच्या मार्गातील अडचणी दूर होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल. त्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहण्याची शक्यता आहे.

मकर
मकर राशीला आज आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण आठव्या स्थानातून होत असल्याने जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. मित्रांसोबतचे वाद, गैरसमज दूर होतील.दांपत्य जीवनातील समस्या कमी होणार आहेत. जोडीदार तुमची काळजी घेणार आहे. त्यामुळे संबंधात मधुरता निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्रात कोणतेही काम घाईगडबडीत करणे टाळावे लागेल. खाण्यापिण्यावर आणि पथ्यपाण्याकडे लक्ष द्यावे लागेल. शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा त्या वाढण्याची शक्यता आहे. नातवाईकांकडून शुभ समाचार मिळणार असल्याने घरातील वातावरणही आनंदी असेल.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्र सप्तम स्थानात भ्रमण करत असल्याने जोडीदाराची साथ मिळणार आहे. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांसाठी चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ साधावा लागेल. खर्च करताना आगामी नियोजन करून खर्च केल्यास अडचणी येणार नाहीत. त्यामुळे स्थैर्याची भावना दृढ होईल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. कौटुंबिक वाद असल्यास ते दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल.

मीन
मीन राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानात होत असल्याने अचानक अडचणी वाढणार आहेत. विनाकारण दडपण किंवा नैराश्याची भआवना निर्माण होणार आहे. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात नकारात्मक विचार दूर ठेवत कामे पुढे न्यावी लागतील. कार्यक्षेत्रातील वातावरण आल्हाददायक असेल. व्यापर- व्यवसाय करणाऱ्यांनी उधार उसनवार टाळावी. विनाकारक वाद टाळल्यास घरातील तणावाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे.