मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी मंगळवारी नाईक चौकात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नायब तहसिलदार पंकज नेवसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, लहुजी वस्ताद यांच्या समाधीचे काम सुरु करावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला निधी मिळावा, पालिकेने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनास करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, प्रवीण शिरसाठ, गणेश दिनकर, आनंद पवळे, सचिन दिनकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार पंकज नेवसे आंदोलनस्थळी आले. त्यांनी तुमच्या भावना सरकारला कळवण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.