रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे बंड शमले, चारही मतदारसंघातून उमेदवारांची माघार

1538

#MahaElection2019 (विधानसभा निवडणूक 2019) महायुती झाल्याने पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी आज माघार घेतली आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी दिली.

चिपळूणमधील माटे सभागृहात सोमवारी दुपारी शिवसेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, भाजप उमेदवार तुषार खेतल, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, बांधकाम सभापती विनोद झगडे, ज्येष्ठ कर्यकर्ते सुधीर काणे, बाळा कदम यांच्यासह शिवसेना – भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पटवर्धन यांनी राजापूरमधून प्रसाद पाटोळे, संतोष गांगण , चिपळूण मधून तुषार खेतल, गुहागरमधून रामदास राणे, दापोलीमधून केदार साठे या भाजप उमेदवारांनी माघार घेतली असल्याचे जाहीर केले.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

दीपक पटवर्धन म्हणाले की, ही महायुतीची निवडणूक आहे. एकही मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होते. म्हणून आमच्या उमेदवारानी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर रविवारी शिवसेना आणि भाजपची संयुक्त बैठक घेण्यात आली. यानंतर सर्वांना युतीची भूमिका पटवून दिली. राजापूरमधून माघार घेतली. आता चिपळूणमधून माघार घेत आहोत. एकदिलाने काम करून शिवसेना उमेदवाराला निवडून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

4 हजार 739 उमेदवार छाननीच्या परीक्षेत ‘पास’

तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेले तुषार खेतल यांनी मी मनापासून महायुतीचे काम करणार असल्याचे सांगितले. तर आमदार सदानंद चव्हाण म्हणाले की, पक्षाचा आदेश मानला असून आजपासून आम्ही एकत्र काम करणार. विजय आमचाच. यावेळी विक्रमी मतांनी विजयी होणार. भाजपचा माझ्या विजयात मोलाचा वाटा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या