रत्नागिरीत आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह; दापोली, संगमेश्वरातील रूग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीत आज कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. हे चारही रूग्ण मुंबईतून आले होते. त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले होते. आज त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी 4 कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली. यापैकी दोन रूग्ण 28 एप्रिल रोजी चेंबूर येथून दापोलीत आले होते त्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. दोन महिला संगमेश्वर तालुक्यातील असून त्या त्यांच्या कुटूंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या कॅन्सरवरील शस्त्रक्रियेसाठी मुंबईत गेल्या होत्या. त्यांनाही संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले होते. आज या चारही रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 15 वर पोहचली असून पाच रूग्णांना त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे.