रत्नागिरी – फासकीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने केली सुटका

रत्नागिरी तालुक्यातील मजगाव आंबेकोंडवाडी येथे शेतात लावलेल्या फासकीमध्ये बिबट्या अडकला. वनविभागाच्या पथकाने फासकी तोडून बिबट्याला जेरबंद केले. ही घटना आज दुपारी घडली.

मजगाव येथील वासुदेव दत्तात्रय अभ्यंकर यांच्या शेतामध्ये फासकीत बिबट्या अडकल्याचे आढळून येताच पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी रत्नागिरीच्या वनरक्षकांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मादी जातीचा दहा वर्षे वयाचा हा बिबट्या होता़. वनविभागाने कटरच्या सहाय्याने फासकी तोडली आणि फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका केली. त्यानंतर बिबट्याची पशुवैद्यकिय अधिकार्यांकडून तपासणी करण्यात आली. पशुवैद्यकिय तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही कार्यवाही परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड, वनपाल गौ.पी. कांबळे, सु.आ.उपरे, वनरक्षक मी.म़.कुबल, वनरक्षक सा.ऱं.पताडे, मिलींद डाफळे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या