रत्नागिरी – मालगुंड समुद्रात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

drowned

मालगुंड समुद्रात पोहण्यासाठी गेलेले तीन पर्यटक बुडाले. त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी घडली.

मुंबईहून तुषार दळवी, शेखर राजे आणि अनिमेश त्रिपाठी हे फिरण्यासाठी गणपतीपुळे आणि मालगुंडला आले होते. गणपतीपुळ्यात एका लॉजवर वास्तव्य केल्यानंतर सायंकाळी ते मालगुंड समुद्रकिनारी गेले. ते तिघेही मालगुंड समुद्रात पोहण्यासाठी गेले .पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. तिघांपैकी शेखर अप्पा राजे वय 34 आणि अनिमेश त्रिपाठी वय 32 यांना वाचविण्यात यश आहे. तुषार शरद दळवी याचा बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदतकार्य करत तुषार दळवीला पाण्यातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुषार दळवीला मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या