
सडामिऱ्या येथे प्रौढाने फणसाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय श्रीपाद डोंगरे (वय 45) मयताचे नाव होते .ही घटना २० ते 21 रोजी सकाळी आठच्या सुमारास गवाणवाडी सडामिऱ्या येथे घडली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत संजय डोंगरे हे नेहमीप्रमाणे शुक्रवार कामावर गेले होते. रात्री दहा वाजेपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने फोन करून कधी येणार असे विचारले त्यावेळी घरी येतो, असे त्यांनी सांगितले, याच दरम्यान त्यांनी फणसाच्या गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी मयत स्थितीत आढळून आल्याने या प्रकंरणी दीपकं श्रीपाद डोंगरे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. आत्म्हत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.






























































