
रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी राजापूर येथे गोवा राज्यातून आणलेल्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा जप्त केला. अंदाजे 22 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा मुद्देमाल असून, या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा राज्यातून मुंबईकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजापूर बसस्थानकासमोर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सापळा रचला. पथकाने संशयास्पद हुंडाई क्रेटा या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली. तपासणीत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली, मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विविध बँडची एकूण 77 बॉक्स दारू आढळून आली.
या कारवाईत दारूसह वाहन असा एकूण 22,19,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या दारूची किंमत 7,19,760 रुपये इतकी आहे. या प्रकरणी वाहनचालक बस्त्याव सायमन घोन्सालविस याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1 च्या कलम 65 (अ) (ई) आणि 90 नुसार गुन्हा दाखल आली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (अ) (ई) आणि 90 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत.