Ratnagiri News – आंबा बागायतदाराने स्वतःवर गोळी झाडत जीवन संपवलं, तोणदे गावातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील ताणदे गावात घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुपेश नागवेकर यांनी त्यांच्या ताणदे येथील राहत्या घरी स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून घेतल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील लोक आणि शेजारी धावून आले असता, रुपेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रुपेश नागवेकर हे एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते. रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. रूपेश नागवेकर यांनी आत्महत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.