
तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम उद्यापासून पहायला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या 56 जागांसाठी आणि नऊ पंचायत समित्यांच्या 112 गणांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांपैकी 28 जिल्हापरिषद गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. वाटद गट अनुसूचित जाती महिला, हातखंबा गट अनुसूचित जाती आणि हर्णे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग – भिंगळोली, बाणकोट, केळशी, जालगाव, कोळबांद्रे, दयाळ, उमरोली, कोकरे, असगोली, खालगांव, कोतवडे, गोळप, पावस, धामापूर तर्फे संगमेश्वर, कडवई, कौसुंब, दाभोळे, गवाणे, वडदहसोळ, धोपेश्वर
मागास प्रवर्ग – सुकिवली, श्रृंगारतळी, पडवे, नाचणे, कर्ला, जुवाठी, भडगाव
सर्वसाधारण महिला – धामणदेवी, कळवंडे, पेढे, खेर्डी, सावर्डे, वहाळ, वेळणेश्वर, झाडगाव म्युन्सिपल हद्दीबाहेर, खेडशी, कसबा, संगमेश्वर, मचुरी, साडवली, आसगे, भांबेड, साटवली, तळवंडे, साखरीनाटे आणि कातळी
मागास प्रवर्ग महिला – पालगड, दाभोळ, भरणे, विराचीवाडी, लोटे, अल्लोरे, शिरगाव, कोंडकारूळ
अनुसूचित जाती महिला – वाटद
अनुसूचित जाती – हातखंबा
अनुसूचित जमाती महिला – हर्णे
गेले अनेक महिने इच्छुक उमेदवार ग्रामीण भागात सामाजिक कार्यातून जनसंपर्क राखून आहेत. आज निवडणूक जाहीर झाल्यामुळे उद्यापासून जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे.































































