Ratnagiri News – एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात, 34 प्रवासी जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर नजीक ओझरखोल येथे गुरुवारी (17 जुलै 2025) सायंकाळी 5:30 वाजता एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 34 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवशांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

मिनी बस चिपळूण वरून रत्नागिरीकडे जात असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर नजीक ओझरखोल येथील वळणावर समोरून येणाऱ्या मंडणगड आगाराची रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने निघालेली एसटी बस यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही बसचे चालक केबिनमध्ये अडकून पडले होते. अचानक झालेल्या या भीषण अपघातामुळे दोन्ही बसमधील प्रवाशांनी एकच टाहो फोडला. दोन्ही बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाले. यातील सहा प्रवाशांना गंभीर स्वरूपाची इजा झाली. अपघात स्थळी संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण आणि त्यांचे सहकारी तातडीने मदतीसाठी उपस्थित झाले. ओझरखोल येथील स्थानिक ग्रामस्थ आणि अनेक वाहनचालक जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत होते. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातून 108 नंबरच्या रुग्णवाहिका अपघात स्थळी दाखल झाल्या. यातून सर्व जखमींना संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व जखमींवर उपचार केले. या अपघातात सहा जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. दोन्ही बसच्या समोरासमोर झालेल्या धडकीनंतर दोन्ही बसचे चालक केबीनमध्ये अडकले होते. यामध्ये मिनी बसच्या चालकाचे दोन्ही पाय अपघातानंतर खूप काळ अडकले होते. उपस्थित सर्वांनी जीवाची बाजी लावून मिनी बस चालकाची सुटका केली. क्रेन आणि जेसीबी बोलवून या चालकांची सुटका करण्यात आली.

दोन्ही बसमधील जखमींची प्राप्त झालेली नावे पुढील प्रमाणे. किरण रहाटे (मिनी बस चालक), अतुल पांडुरंग पिटले (सावर्डे), आशिष प्रमोद विभुते (देवरुख, मिनी बस क्लीनर), तन्वी (चिपळूण), सायली संतोष हेगडे (निवळी), अनिश अनिल पाटणे (कोळंबे), आयुष संजय मयेकर (मिऱ्या रत्नागिरी), मंगेश विजय दुधाणे (एसटी बस वाहक), सचिन बाबासाहेब केकान (ओझरखोल), संतोष तानाजी गायकवाड, रामचंद्र फेपडे, रघुनाथ पाठक, राजू चोचे, शेखर सतीश साठे, सुशील धोंडीराम मोहिते, सरिता धोंडीराम मोहिते, अजय रामदास भालेराव, अनुराधा शिवाजी धनावडे, विनय विश्वनाथ प्रसादे, सुशील दत्ताराम मोहिते, उमामा मुल्लाजी, अनिकेत अनंत जोगले, किरण राठी, रामचंद्र बाबू, वैशाली सिद्धार्थ सावंत, अहर्ता संतोष सावंत, केतन श्रीकृष्ण पवार, सिद्धार्थ गोपाळ सावंत, सारा हबीब फकीर, अण्णा बाबासाहेब पवार अशी आहेत. या अपघाताबाबत संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किशोर जोयशी, विनय मनवल, कोलगे, वांद्रे, खडपे वाहतूक शाखेचे पोलीस मुजावर, स्थानिक ग्रामस्थ आदींनी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली. सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावरील ड्रायव्हरजनची स्थिती बदलल्यामुळे घडल्याचे सांगितले जात होते.