61 लाखांचा गंडा घालणाऱ्याला अटक

मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मंत्रालयातून बोलतोय सांगून तुमच्या नावाने बँक खात्यातून दोन कोटी रुपयांचे मनी लॉण्डरिंग झाले असल्याचे सांगून 61 लाख 19 हजार 080 रुपयांना गंडा घालणाऱ्या आरोपीला दिल्ली येथे जाऊन रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीला पह्न करून मी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मंत्रालयातून बोलतोय सांगून आपले सीम कार्ड बंद होत असल्याचे सांगून तक्रारीसाठी पोलिसांकडे फोन जोडत आहे असे सांगितले. दुसऱ्या व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आपल्या नावाने कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यामधून दोन कोटी रुपयांचे मनी लॉण्डरिंग  झाल्याचे सांगितले. फिर्यादीला 61 लाख 19 हजार 80 रुपये भरण्यास सांगून फसवणूक केली.