रत्नागिरी-शिर्डी वातानुकुलीत बस सेवा सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या रत्नागिरी ते शिर्डी वातानुकूलीत बससेवेचा शुभारंभ शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते रहाटाघर येथे करण्यात आला.

रत्नागिरी ते शिर्डी अशी वातानुकूलीत बससेवा आजपासून सुरु करण्यात आली. ही बस दररोज सकाळी 8 वाजून 15 मिनीटांनी रत्नागिरीतून सुटणार आहे. शिर्डीहून सुटणार्‍या बसची वेळ सकाळी 8 वाजून 15 मिनीटांची आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते फित कापून शिर्डी बससेवेचा शुभारंभ कंरण्यात आला. यावेळी एसटीचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

बस मार्ग –
ही बस मलकापूर – कोकरुड – कराड – कुसेसावळी – वडूस – दहीवडी – फलटण – बारामती – दौंड – नगर – राहुरी – शिर्डी अशा मार्गावरुन धावणार आहे.