रत्नागिरी – दुकानफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल शॉपीसह अन्य दुकाने फोडून चोरी करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.मोबाईल शॉपीतील चोरीला गेलेल्या मालमत्तेपैकी 1 लाख 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

23 सप्टेंबर रोजी नाचणे रोड येथील मोबाईल वर्ल्ड हे दुकान फोडून 12 मोबाईल हॅण्ससेट,15 हजार 700 रूपये रोख रक्कम आणि अन्य साहित्य चोरीला गेले होते. 6 सप्टेंबर रोजी दुर्गा टायर दुकान आणि दर्पण फोटो स्टुडिओ फोडून टायर आणि कॅमेऱ्यांची चोरी झाली होती.या चोरीचा शोध घेताना पोलिसांनी खंडाळा येथे दोन संशयितांची चौकशी केली.अमित रवींद्र भोसले वय 22 रा.रिगी फाटा आणि प्रशांत वीर वय 19 रा.कळझोंडी अशी या दोन आरोपींची नावे असून सखोल चौकशी नंतर त्यांनी घरफोडीचे दोन गुन्हे कबूल केले आहेत.यादोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

मोबाईल दुकानातील चोरलेले 12 मोबाईल,एक ब्ल्यू टूथ आणि 15 हजार 700 रूपयांची रोख रक्कम आणि टायर दुकानातील सहा टायर, फोटो स्टुडिओतील कॅमेरा आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.