रत्नागिरीत कडाप्पे अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील उद्यमनगर येथे नवीन बांधकामाच्या ठिकाणी लाद्या उचलून टेम्पोत भरताना चार कामगारांच्या अंगावर लाद्या पडून दोघांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पो चालकाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विठ्‌ठल रेवाळे,असे संयित चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जखमी कामगार संतोष जनार्दन कांबळे हे व अन्य कामगार यांना घेऊन संयित चालकं रेवाळे टेम्पो घेऊन सायंकाळी साडेसातच्या सुमारास लेप्रसी हॉस्पिटलच्या नवीन बांधकामाच्या येथे लाद्या उचलण्यासाठी गेले होते. या मोठ्या लाद्या दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत होत्या. एका ठेकेदाराने महिला रुग्णालयाच्या कामावरील असलेले मोठे कडाप्पे टेम्पोत भरुन दुसऱ्या साईटवर देण्यासाठी गाडी पाठवली होती. हॅलोजनच्या प्रकरात हे काम सुरु होते. एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत टेम्पो उभा करण्यात आला होता. झुकलेल्या बाजूला कडप्पाने भरल्यानंतर उर्वरित कडप्पानने दुसऱ्या बाजूला भरण्याचे काम सुरु होते. टेम्पोच्या हौद्यात लाद्या भरत असताना चालकाने निष्काळजीपणाने टेम्पो चालवल्याने लाद्या कामगारांच्या अंगावर पडून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत चारपैकी दोन हमालांचा मृत्यू झाला. सुरज सुधाकर सोलकर आणि सावळे निसाद केवठ असे मृत कामगारांची नावे होती. तर इतर दोन गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी टेम्पो चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.