मतदारसंघ पुर्नरचना; रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सात तर पंचायत समितीचे 14 गण वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदारसंघाची पुर्नरचना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिलेहापरिषदेचे सात गट तर पंचायत समितीचे 14 गण वाढणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाला याबाबत प्रपत्र सादर करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 55 गट आणि पंचायत समितीचे 110 गण आहेत. जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर निवडणूकाचे पडघम वाजू लागले आहेत. यंदाच्या निवडणूकीत मतदारसंघाची पुर्नरचना होणार आहे. नव्या पुर्नरचनेनुसार जिल्ह्यात सात जिल्हापरिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण वाढणार आहे. नव्या रचनेनुसार जिल्ह्यात 62 जिल्हापरिषद गट आणि 124 पंचायत समिती गण निर्माण होतील. नवीन निकषानुसार जिल्हापरिषद गटांची लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. जुन्या निकषाप्रमाणे सर्वाधिक लोकसख़्या असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव जिल्हापरिषद गट किंवा गणाला दिले जात होते. नव्या निकषानुसार सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महसूल गावाचे नाव जिल्हापरिषद गट किंवा पंचायत समिती गणाला दिले जाणार आहे.