महाराष्ट्राचे साहित्य ‘रत्न’ निखळले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

1809

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे रविवार, 17 मे रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य आणि नाट्यक्षेत्राची हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे साहित्य ‘रत्न’ निखळले, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.

‘ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार श्री रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य-नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असतांनाही रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य लिहीत गेले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे साहित्य’रत्न’ आज निखळले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली’

आपली प्रतिक्रिया द्या