पंत, खेळ सुधार नाहीतर फटके मिळतील! नाराज शास्त्रींचा दणका

1043

टीम इंडियाचा भावी ‘धोनी’ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या ऋषभ पंतला निवड समिती सातत्याने संधी देत आहे. नुकताच हिंदुस्थानचा संघ विंडीज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातही पंतला संधी देण्यात आली होती. तसेच 2020 मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पंत ‘फर्स्ट चॉईस’ असणार हे देखील निवड समितीने स्पष्ट केले आहे. परंतु सातत्याने संधी मिळून पंतकडून हवा तसा खेळ होताना दिसत नाहीये. विंडीज दौऱ्यावर तर पंत सपशेल अपयशी ठरला. धसमुसळेपणाने फलंदाजी करून विकेट गमावणाऱ्या पंतवर चाहत्यांसह टीम इंडियाचे रवी शास्त्री नाराज आहेत.

हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीचा जगभरात ‘विक्रम’, आकडेवारी वाचून थक्क व्हाल

स्टार स्पोर्टशी (Star Sports) बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, ‘ऋषभ पंतला स्थिरावण्यासाठी वेळ दिला जात आहे. परंतु विंडीजविरुद्ध त्रिनिनादमध्ये झालेल्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट फेकली. यापुढे तो मला असा फटका खेळताना दिसला तर त्याला फटके मिळतील. खेळ दाखव नाहीतर परिणाम भोगायला तयार रहा. तू तुझ्या खेळीमुळे संपूर्ण संघाचे मनोधैर्य खच्ची करतोयस. तुझ्या समोर कर्णधार साथ द्यायला आहे, संघाला एक विजयासाठी एक लक्ष्य मिळालेले आहे, अशावेळी असा बेजबाबदार फटका खेळून बाद होणे केवळ अमान्य आहे. तुझ्याकडून आता चांगल्या आणि संयमी खेळाची अपेक्षा आहे.’

ICC Ranking – स्मिथ-कोहलीमधील अंतर झाले आणखी ‘विराट’

शास्त्री पुढे म्हणाले की, पंतने आपल्या खेळाची शैली बदलावी अशी अपेक्षा नाहीय. मात्र सामन्याचे चित्र पाहून त्यानुसार आपला खेळ कसा करायचा हे अपेक्षित आहे. जर ऋषभला हे साध्य झाले तर त्याला कोणीच थांबवू शकत नाही. याला कदाचीत थोडा वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

आफ्रिकेविरुद्ध संधी
दरम्यान, टीम इंडिया आणि आफ्रिकेमध्ये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पंतला दमदार खेळी करून शास्त्रींचे मन जिंकण्याची संधी आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसरा सामना बुधवारी (18 सप्टेंबर) चंदीगडमध्ये खेळला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या