
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारा हिंदुस्थानचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन फेब्रुवारी महिन्यातील ‘आयसीसी’चा सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला. सलग दुसऱया महिन्यात हिंदुस्थानी खेळाडूने हा पुरस्कार जिंकला. जानेवारी महिन्यातील पहिल्या पुरस्काराचा बहुमान हा रिषभ पंतने पटकाविला होता.
फेब्रुवारीत 24, तर मालिकेत 32 बळी
रविचंद्रन अश्विनने फेब्रुवारीमध्ये तीन कसोटी सामन्यांत 24 बळी टिपले, तर इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकूण 32 फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला. अश्विनने तीन कसोटीत 35.20 च्या सरासरीने 176 धावा फटकाविल्या, तर चेन्नईतील दुसऱया कसोटीत हिंदुस्थानचा डाव संकटात असताना 106 धावांची शतकी खेळीही केली.


























































