आर. अश्विन करतोय एका हाताने बॅटिंग, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघातील ऑफ स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहे.

अश्विननेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे. उजव्या बाजूचा फलंदाज असणारा अश्विन यात एकाच हाताने फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडीओखाली त्याने मजेदार कॅप्शन दिली आहे. पुन्हा एकदा शाळेत! कामावर परतणं इतकं सोप्पं वाटायला लागतं! असं तो या व्हिडीओखाली म्हणाला आहे.

येत्या 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अश्विनची निवड करण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेतला मलिकेत अश्विन फारसा प्रभाव टाकू शकला नव्हता.

त्यानंतर निवड समितीने पुन्हा एकदा कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीवर विश्वास टाकून त्यांची निवड केली होती. त्यांच्यासोबत रवी बिश्नोई या तरुण खेळाडूलाही संघात स्थान देण्यात आलं होतं. या दरम्यान, अश्विनला दुखापतीमुळे संघात स्थान मिळवता आलं नसल्याची माहिती देखील मिळत होती.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashwin (@rashwin99)