रवीकुमार देशातील पहिला अधिकृत नास्तिक, ‘नो कास्ट, नो रिलीजन, नो गॉड’ प्रमाणपत्र

51

सामना ऑनलाईन । पानिपत

हरयाणा सरकारने रवी कुमार या युवकाला देशातील पहिला अधिकृत नास्तिक घोषित केला आहे. एकढेच नाही तर त्याची कोणतीही जात नाही, कोणताही धर्म आणि देव नसल्याचे प्रमाणपत्रच जारी केले आहे. अशा तऱहेने रवी कुमारच्या दोन वर्षांच्या कायदेशीर लढय़ाला यश आले आहे. यापुढे तो रवी नास्तिक म्हणून ओळखला जाणार आहे.

हरयाणाच्या टोहाना येथे राहणाऱ्या रवीने नावात बदल करण्यासाठी 2017 मध्ये फतेहाबाद न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता. त्याला यंदाच्या जानेवारीमध्ये नावासोबत नास्तिक लिहिण्याची अनुमती देण्यात आली. त्यानंतर आता उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयाने रवी नास्तिकला ‘नो कास्ट, नो रिलीजन आणि नो गॉड’ प्रमाणपत्र दिले आहे.

रवी याचे वकील अमित कुमार सैनी यांनी सांगितले, उपजिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व कागदपत्रे तपासून रवी कुमार गुन्हेगार तर नाही याची चौकशी केली गेली. तसेच अन्य देशांशी काही संबंध आहेत का याचीही चौकशी केली गेली. तसेच रकी हा या प्रमाणपत्राचा वापर अन्य कोणत्या कारणांसाठी करणार नाही, याबाबतही खात्री करण्यात आली. एकढय़ा चौकशीनंतर त्यांनी उपतहसीलदारांना आदेश देत 29 एप्रिल रोजी त्याला नास्तिक असल्याचे प्रमाणपत्र दिले.

सेल्फ डिक्लेरेशन
रवीचे वडील इंद्रलाल फर्निचरचे काम करतात. आपली ओळख एखाद्या विशिष्ट जाती, धर्माने व्हावी असे त्याला काटत नव्हते. यामुळे हे प्रमाणपत्र बनविले आहे. याआधी असे प्रकरण आपण पाहिले नाही. सेल्फ डिक्लेरेशनच्या आधारावर त्याला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी धीरेंद्र खडगटा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या