मसूर डाळ मधुमेहींनी आहारात का समाविष्ट करायला हवी, वाचा

आपल्या आहारामध्ये डाळींचा समावेश हा खूप गरजेचा आहे. उत्तम आरोग्यासाठी विविध डाळींचा समावेश आहारात व्हायलाच हवा. म्हणूनच आपल्याकडे डाळींपासून विविध पदार्थ करण्याची पद्धत ही फार पूर्वीपासून आहे. डाळींच्या आमटीपासून ते अगदी विविध भाज्यांमध्ये समावेश केला जातो. म्हणूनच डाळींचे महत्त्व हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

आहारामध्ये डाळींची गरज ही उत्तम पोषणासाठी तर असतेच. शिवाय डाळींमधून आपल्याला भरपूर प्रथिने असतात. ही प्रथिने आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी खूप उपयुक्त मानली जातात. डाळींमध्ये याशिवाय फायबरची मात्राही मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच आपल्या उत्तम आरोग्यासाठी डाळी खाणे हे खूप महत्त्वाचे आहे. डाळींमधील लालचुटूक डाळ म्हणजेच मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी का महत्त्वाची आहे हे जाणून घेऊया.

रोज आहारात बीट समाविष्ट करण्याचे अगणित फायदे, जाणून घ्या

मसूर डाळीचे आरोग्यवर्धक फायदे

त्वचेसाठी मसूर डाळ ही अतिशय गुणकारी मानली जाते. म्हणूनच मसूर डाळीचा खाण्यासोबतच चेहऱ्याला लावण्यासाठी सुद्धा उपयोग करण्यात येतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मसूर डाळ ही खूप गरजेची मानली जाते.

आहारात लोणचे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

मसूर डाळीमध्ये प्रोटीनची मात्रा फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शाकाहरी लोकांच्या आहारात या डाळीचा समावेश हा खूप गरजेचा असतो.

आयरनची मात्रा ही मसूर डाळीमध्ये सर्वाधिक प्रमाणात असल्यामुळे, आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत मिळते.

बडीशेप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून व्हाल थक्क

मसूर डाळीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फाॅस्फरसचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या हाडांचे उत्तम पोषण होण्यास मदत होते.

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे, डायबेटीज असणाऱ्यांसाठी मसूर डाळ फार उपयुक्त मानली जाते.