रिअल इस्टेट क्षेत्राला वेग देण्यासाठी साई इस्टेटची अनोखी मोहीम

865

साई इस्टेट कन्स्लटंट्स चेंबुर प्रा. लि. (एसईसीसीपीएल) या मुंबईतील एकमेव व्हर्च्युअल बिल्डर्सने #SaiKaPartner ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. अशा प्रकारच्या या अनोख्या मोहिमेतून रिअल इस्टेट परिसंस्थेला व्हर्च्युअली जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांची अधिक सक्षम आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. सायनिंग अपसाठी जुजबी फी भरून कोणालाही #SaiKaPartner होता येईल आणि सीईसीसीपीएलतर्फे त्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

केपीएमजीच्या अहवालानुसार, या संकटाच्या आधी आर्थिक वर्ष 21 साठी जे अंदाज बांधले गेले होते त्या तुलनेत बांधकामाशी संबंधित जीव्हीए (ग्रॅस व्हॅल्यू अॅडेड) आणि रोजगारामध्ये अनुक्रमे 15-34 टक्के आणि 11-25 टक्के घट होणार आहे. कोविड-19 मुळे बाजारपेठेची जी स्थिती आहे ती पाहता पारंपरिक रीअल इस्टेट बाजारपेठेला उत्क्रांत व्हावे लागणार आहे आणि शाश्वत व्यवसायासाठी विकासकांना तंत्रज्ञानाचा अंगिकार करावा लागणार आहे. केंद्र सरकार मौठ्या प्रमाणावर परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना अर्थव्यवस्था पुन्हा एकदा प्रगती करण्यास सज्ज होईल. कौशल्य विकासासाठी हीच योग्य वेळ असताना एसईसीसीपीएल स्वयंरोजगाराला चालना देत आहे आणि नियमित उत्पन्नाचा खात्रीशीर मार्ग म्हणून या क्षेत्रातील एका सगळ्यात मोठ्या ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे.

या मोहिमेच्या सादरीकरणाबद्दल एसईसीसीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित बी वाधवानी म्हणाले, “सध्याचे संकट लक्षात घेता आम्ही आम्ही असे काही सादर करू इच्छितो ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे भविष्य सुरक्षित करता येईल. अनेक महत्त्वाकांक्षी उद्योजगंना ब्रोकिंग व्यवसायाचे हे स्वरुप आणखी पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याची उत्सुकता आहे, असे आम्हाला वाटते. अधिक उत्पन्न आणि आमच्या तज्ज्ञांतर्फे प्रशिक्षण घेण्याची संधी देणारी ही संकल्पना त्यांना सक्षम करणारी आहे आणि फक्त एक बटण क्लिक करून त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही मुंबई आणि गुजरात या भागात लक्ष केंद्रित करत आहोत. अर्थात भारतभरातून कोणीही आपल्या मोबाइल फोनवरून पैसे भरून सदस्यत्व घेऊ शकेल.”

#SaiKaPartner या मोहिमेतून संभाव्य भागीदारांना ब्रँड सर्वांसमोर असणे, प्रशिक्षण अशा सुविधा मिळतील आणि त्यातून त्यांना विक्रीत फायदा होईल. या प्रक्रियेतील अनेक मुद्द्यांची आयअॅमसाई परिसंस्थेतर्फे काळजी घेण्यात येईल. त्यामुळे सोल सेलिंग एक्सक्लुसिव्ह नियमांप्रमाणे या भागीदारांना साई मार्केटेड प्रकल्पांमध्ये व्यवसायाच्या अधिक संधी उपलब्ध होतील. कार्यकक्षा रुंदावण्यासाठी सुयोग्य व्यासपीठ निर्माण करून मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करत आयअॅमसाई नेटवर्क सेवेतून भागीदारांना अधिक वेगाने विक्री करणे शक्य होईल. अप्रत्यक्षपणे नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून बांधकाम कामाला वेग देऊन अधिक संधी निर्माण होतील.

आपली प्रतिक्रिया द्या