देशातील पहिला 64MP कॅमेऱ्याचा स्मार्टफोन लॉन्च, वाचा वैशिष्ट्य आणि किंमत…

2738

स्मार्टफोनची आवड असणाऱ्यांसाठी आणि नवीन स्मार्ट घेणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. रियलमी (Realme)ने नवीन स्मार्टफोन Realme XT हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याला 64MP चा कॅमेरा असणार आहे.

realme-xt2

Realme XT च्या 4GGB/64GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. यासह कंपनीने 6GB/64GB आणि 8GB/128GB व्हेरिएंट लॉन्च केले आहे. याची किंमत अनुक्रमे 16,999 आणि 18,999 रुपये आहे. सोमवारपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे.

स्मार्टफोनची वैशिष्ट्य –

  • 6.4 इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन
  • स्मार्टफोनचे फ्रंट आणि बॅक पॅनल गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड
  • सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंरप्रिंट सेन्सर
  • 64MP चा कॅमेरा सेटअप

realme-xt

 

 

  • 4000 एमएएचची दमदार बॅटरी
  • 8 GB रॅम
  • 3.5 एमएमचे हेडफोन जॅक आणि लाऊडस्पीकर
  • स्मार्टफोन वजनाने हलका (183 ग्राम)

आपली प्रतिक्रिया द्या