64 मेगापिक्सल कॅमेराचा Realme X50 5G स्मार्टफोन लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिअलमी (Realme) कंपनीचा बहुचर्चीत Realme X50 5G हा स्मार्टफोन मंगळवारी लॉन्च करण्यात आला. तीन वेगवेगळ्या व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा जरबदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या हा फोन फक्त चिनी बाजारात लॉन्च करण्यात आला असला तरी येत्या काही दिवसांमध्ये अन्य देशांमध्येही खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले.

realme-x50-5g-3

तीन व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असणाऱ्या या फोनच्या किंमती –
– 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असणाऱ्या फोनची किंमत चिनी बाजारात 25800 रुपये (2499 येन)
– 6 जीबी रॅम आणि 256 जीबी मेमरी असणाऱ्या फोनची किंमत 28000 रुपये (2699 येन)
-12 जीबी रॅम आणि 256 जीबी मेमरी असणाऱ्या फोनची किंमत 31000 रुपये (2999 येन) असणार आहे.

realme-x50-5g

वैशिष्ट्य –
– फोन तीन व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध
– 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी, 6 जीबी रॅम आणि 256 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅम आणि 256 जीबी मेमरी
– पोलर आणि ग्लेशियर या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.
– 4200 एमएएचची दमदार बॅटरी
– 6.5 इंचांचा एलसीडी डिस्प्ले
– क्वाड रिअर कॅमेरा सेटअप
– 64 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
– 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– Android 10 ओएस सपोर्ट सिस्टीम