
भाजप पाठोपाठ मिंधेगटातही नाराज कार्यकर्त्याचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळाले. मनपा निवडणूकीसाठी प्रभाग-२० मधून मिंधेगटाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या सुनील सोनवणे यांनी कार्यकर्त्यांसह पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर ठाण मांडले.
भाजप आणि मिंधेगटाची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांना सर्व जागांवर उमेदवार देण्यासाठी धावपळ करावी लागली. यात ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी भाजप कार्यालयात दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला. नाराजीचा केंद्रबिंदू आज मिंध्यांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याकडे सरकला. प्रभाग २० मध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे संतापलेले सुनील सोनवणे यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांसह ठाण मांडले. मी पक्का दावेदार असतानाही भाजपमधून आलेल्या उपर्याला तिकिट दिले, मला नाकारण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी केला.


























































