
देशभरात सोमवारी कोरोना आणि सक्रिय रुग्णांमध्ये विक्रमी घट झाली असतानाच आज कोरोनाने चक्क लोळण घेतली. देशात आज दिवसभरात 3 हजार 325 रुग्ण सापडले, तर 17 जणांचा मृत्यू झाला. यात केरळमध्ये सर्वाधिक 7 मृत्यूंची नोंद झाली. दरम्यान, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही पुन्हा मोठी घट होत ती संख्या 44 हजार 175 वर पोहोचली आहे.
देशात एप्रिल महिन्याच्या मध्यापासून दरदिवशी सरासरी 10 हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण सापडत होते. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी झाली असून आज देशभरात 3 हजार 325 रुग्ण सापडले तर 17 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत केवळ 47 रुग्ण
मुंबईत गेल्या काही दिवसांत वाढत जाणाऱया कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक लागला असून आज दिवसभरात 47 रुग्ण सापडले, तर 191 जण कोरोनामुक्त झाले. सक्रिय रुग्णांची संख्याही दीड हजारांवरून आज 786 वर पोहोचली आहे. मुंबईत आज 679 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 139 रुग्ण सापडले, तर एकाचा मृत्यू झाला.





























































