
एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीत रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह, युटिलिटी एजंट, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, सीनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या विविध पदांसाठी 18 ते 23 डिसेंबर या कालावधीत थेट मुलाखती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, गेट क्र. 5, जी.एस.डी. कॉम्प्लेक्स, सहार पोलीस ठाणेजवळ, सहार, अंधेरी (पूर्व) येथे घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे थेट मुलाखतीपूर्व मार्गदर्शन वर्ग शुक्रवार, 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता एअर इंडिया मॉडर्न स्कूल, ओल्ड एअर इंडिया कॉलनी, कलिना, सांताक्रुझ (पूर्व) या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.
शिवसेना नेते, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार विलास पोतनीस व स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. मुलाखतपूर्व मार्गदर्शन वर्गासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रशांत सावंत (9820151518), प्रवीण शिंदे (9987656709), अजित चव्हाण (9821987677), बाळासाहेब कांबळे (9969526090), अमोल कदम (9870130723), उमेश सानप (8976239434), निलेश लांजेकर (9819861807) यांच्याशी संपर्क साधावा. भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी www.aiasl.in या संकेतस्थळावर भेट द्या.



























































