सुंदर मी होणार – ये लाल रंग

>> पूजा सामंत

लाल रंग म्हणजे प्रेमाचे प्रतीक समजले जाते. आपले व्यक्तिमत्त्व ज्या रंगामध्ये उठून दिसत असेल तो रंग वरचेवर वापरण्यास काही हरकत नाही.

भारून टाकणारी ऊर्जा
प्रसिद्ध फॅशन डिझायनर शाहिन मनन म्हणतात, लाल रंग नेहमीप्रमाणे यंदाही कलर ऑफ द सीझन, कलर ऑफ द डे असणार आहे. लाल रंगात असलेली ऊर्जा भारून टाकणारी असते. प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल रंगाने जगभर स्थान मिळवले आहे. लाल रंगाचे कपडे प्रेमाच्या भावना सहज व्यक्त करतात. लाल रंग एक बोल्ड कलर म्हणून ओळखला जातो. यंदाचा सॉफ्ट फ्लोविंग सिल्व्हेटसवर बारीक वर्क म्हणजे सिक्वेन्स किंवा एम्ब्रॉयडरी असलेले तलम ड्रेस, आधुनिक स्टाइल्सचे ड्रेस हादेखील ट्रेंड लक्ष वेधवून घेऊ शकतो.

अनेक वैविध्यपूर्ण सण आणि परंपरांनी युक्त आपल्या देशात मागील काही वर्षांपासून विविध डेची भर पडली आहे. तरुणाईमध्ये फ्रेंडशिप डे, टेडी डे, व्हॅलेंटाईन डे असे विविध दिवस साजरे करण्याचे फॅड आहे. विविध डेंचे वाढते सेलिब्रेशन बघून फॅशनची दुनिया चौफेर वाढली. आता तर प्रत्येक दिवसाचा ड्रेस कोड निर्माण झाला आहे.

लाल रंग म्हणजे प्रेमाचे प्रतीक समजले जाते. लाल रंगाचा स्कर्ट-टॉप, ब्लेझर, टी शर्ट यांपैकी काहीही स्टायलिश ड्रेस घालू शकता. पिंक अर्थात गुलाबी रंगालादेखील प्रेमाचा रंग मानला जातो. प्रेमाची मागणी मान्य म्हणजे गुलाबी रंगाचे परिधान, तर प्रेम अव्हेरणे म्हणजे काळा रंग. हिरवा रंग प्रतीक्षा दर्शवतो, तर सफेद रंग ‘एंगेज’ असल्याचे दर्शवतो. ड्रेस कोडच्या या मालिकेत आणखी काही रंग आहेत ज्यातून काही अर्थ अभिप्रेत आहेत. डाळिंबी रंगाची ब्रोकेड साडी, त्याला कॉन्ट्रास्ट मोत्यांचा सेट, पोनीटेल, लाल लिपस्टिक हा अतिशय सौम्य तरीही खास आणि ट्रेंडी लुक आहे असे फॅशन डिझायनर पायल सिंघल म्हणाल्या. काळानुरूप, वयानुसार ड्रेस कोड बदलत जातो असे सर्वसाधारण चित्र दिसून येते. माझे स्वतःचे असे मत आहे, लाल रंग जर तुम्हाला प्रिय नसेल व हा रंग फार डार्क शेड आहे असे वाटत असल्यास त्या रंगाची निवड करावी जो तुम्हाला आत्मविश्वासपूर्ण वाटेल. जो रंग तुम्हाला खुलून दिसत असेल. मग हा रंग पिवळा, क्रीम (ऑफ व्हाइट), पिंक का असेना! आपले व्यक्तिमत्त्व ज्या रंगामध्ये उठून दिसत असेल तो रंग वरचेवर वापरण्यास काही हरकत नाही. ट्रेंड काहीही असो, स्वतःच्या आवडीनिवडी जपणे याला प्राधान्य द्या.

सौंदर्यात भर घालणारे दहा प्रकार करण्यापेक्षा मिनिमलिस्टिक लुक ठेवावा. सॉफ्ट फॅब्रिक्स आणि फेमिनाइन कट्स तुमच्या ड्रेसला असावेत. सटल स्टेटमेंट पीस ज्वेलरी वापरावी. नाजूक डिझाइन असलेले चोकर नेहमीच उठून दिसतील. हातात मोठय़ा बॅगपेक्षा बोल्ड क्लच असावे जे तुमच्या ड्रेसला शोभून दिसतील. हिंदुस्थानी ड्रेस असो अथवा पाश्चात्य, वैयक्तिक आवड लक्षात घेऊन तयार व्हा असेच मी म्हणेन.