
सामना प्रतिनिधी, मुंबई
मालाड येथे राहणारा रेहान नूरमहम्मद शेख हा 11 वर्षांचा मुलगा ब्लड कॅन्सरशी झुंजत आहे. रेहान याच्यावर बॉन मॅरो ट्रान्सप्लांटची शस्त्र्ाक्रिया करायची असून त्याच्या उपचारासाठी एकूण 26 लाख रुपये इतका होणार आहे. शेख कुटुंबाचे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांना उपचाराचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन शेख कुटुंबाने केले आहे.
रेहान शेख हा इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. रेहानच्या रक्तातील पांढऱया पेशी कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर 25 ऑगस्टपासून परळच्या जेरबाई वाडिया रुग्णालयात त्याच्यावर विविध चाचण्या करण्यात येत आहेत. त्यातून त्याला जेएमएमएल ब्लड कॅन्सर (एचएलएल टाइप) निदान झाले आहे. रेहानच्या शरीरातील रक्त बदलण्यात येणार असून त्याच्यावर स्टेम सेल/ बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. केमोथेरपी, स्टेम सेल ट्रान्सप्लांट, ब्लड प्रोडक्ट, चाचण्या आणि अन्य उपचारांचा खर्च 26 लाख रुपये इतका होणार आहे. वाडियाचे डॉ. प्रशांत हिवरकर यांच्या देखरेखीखाली रेहानवर उपचार सुरू आहेत.
रेहानचे वडील नूरमोहम्मद शेख बांधकाम व्यवसायात हेल्पर म्हणून काम करतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न जेमतेम 95 हजार रुपये इतके आहे. रेहानची आई ही गृहिणी आहे. शेख कुटुंबीयांनी रेहानसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
कशी कराल मदत
दानशूरांनी मदतीचा धनादेश Bai Jerbai Wadia Hospital For Children या नावाने काढावा. धनादेशाच्या मागे रुग्णाचे नाव- रेहान नूरमोहम्मद शेख, ओपीडी नंबर 1134120 लिहावे. अधिक माहितीसाठी संपर्क – कविता कनोजिया, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, हिमॅट ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन, परळ, मोबाईल 9833210857 किंवा नूरमोहम्मद शेख मोबाईल 9920656222.





























































