
सामना ऑनलाईन,मुंबई
मागील सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ निवडणुकीने वातावरण ढवळून निघाले. राज्यातील अंतिम टप्प्याचे मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या धामधुमीत उसंत मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात भेडसावणाऱ्या दुष्काळावर लक्ष केंद्रित केले आहे. भीषण दुष्काळाची स्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी फडणवीस यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचा कालावधी 23 मेपर्यंत आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता काढत असून आचारसंहितेच्या काळात उपाययोजना करताना आचारसंहितेचा भंग होऊ नये, तसेच नागरिकांना दिलासा मिळाका यासाठी भारतीय निकडणूक आयोगाने दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहितेत शिथिलता आणाकी अशी मागणी मुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस यांनी केली आहे. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. आचारसंहिता लागण्याआधी केलेल्या उपाययोजना आता तोकडय़ा पडू लागल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी कामांसाठी आकश्यक निधी आणि नियोजनासाठी आचारसंहिता शिथिल करणे आकश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निकडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मंत्रिमंडळ बैठक घ्यावी लागेल
राज्यात पिण्याच्या पाण्याची क्यकस्था करणे, नक्या किहिरी आणि बोअर खणणे तसेच पाण्याच्या कॅनॉल दुरुस्ती करणे अत्याकश्यक झाले आहे. त्यासाठी आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठक घेऊन केंद्राने मंजूर केलेल्या 4714 कोटी रुपयांच्या किनियोगाबाबत मंत्रिमंडळात चर्चा कराकी लागणार आहे. यासाठी तातडीने मंत्रिमंडळ बैठक घ्यावी लागणार असल्याची स्थिती मुख्यमंत्र्यांकडून मांडण्यात आली आहे.
2009 साली दिली होती परवानगी
दुष्काळाची दाहकता समजून घेऊन त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांचे दौरेदेखील आयोजित करण्यात येतात. त्यामुळे पुन्हा या दौऱ्यांना परकानगी मिळाकी असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे, मात्र राज्यात दुष्काळी भागाची क्याप्ती काढत असल्याचेही मदत आणि पुनर्कसन किभागाचे म्हणणे आहे. आयोगाने 2009 मध्ये उद्भकलेल्या स्थितीला अनुसरून अशा प्रकारची अनुमती दिली होती याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.
राज्यातील जलाशयांत केवळ 19.63 टक्के पाणी
राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 19.63 टक्के पाणी असून कोकणात 36.58 टक्के, पुण्यात 22.0 टक्के, अमरावती 19.28 टक्के, नाशिकमध्ये 16.2 टक्के, नागपूर 8.67 टक्के, संभाजीनगर 20.73 टक्के इतकी पाण्याची पातळी खालावल्याने पावसाने ओढ दिल्यास दुष्काळाची स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
टँकरची संख्या वाढली
22 एप्रिलला राज्यात 4 हजार 594 टँकरने पाणीपुरवठा सुरू होता, पण मागील नऊ दिवसांत टँकरची मागणी वाढली आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या 4 हजार 774 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्कात बिकट परिस्थिती मराठवाडय़ात आहे. मराठवाडय़ात टँकरची मागणी दिवसेंदिवस काढत आहे. मागील आठवडय़ात मराठवाडय़ात 2 हजार 470 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू होता. पण सध्याच्या आकडेवारीनुसार मराठवाडय़ात 2 हजार 534 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. संभाजीनगरमध्ये एक हजार टँकरच्या मदतीने गावे, वाडय़ा-वस्त्यांमधील रहिवाशांची तहान टँकरच्या पाण्याने भागवली जात आहे.

































































