रिलायन्स डिसेंबरपर्यंत आणणार दहा कोटी स्वस्त 4 जी स्मार्टफोन !

चिनी कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओ डिसेंबरपर्यंत चक्क दहा कोटी फोर जी स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये असून यासोबत कंपनी डेटा प्लानचीदेखील ऑफर देऊ शकते.

जुलै महिन्यामध्ये गुगलने जिओसोबत भागीदारी करत 4.5 मिलियन डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली होती. त्यानुसार जिओ आणि गुगलच्या भागीदारीतून हा फोन लाँच होणार आहे. हिंदुस्थानातील 2 बिलियन डॉलरच्या स्मार्टफोन मार्केटवर सध्या चिनी स्मार्टफोन कंपनींचा कब्जा आहे. रिलायन्स कंपनीने 2017 साली जिओ फोन लाँच करून या सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता. जिओ फोनचे सध्या 10 कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या