
समस्त स्त्रीवर्गाला उंबरठा ओलांडण्याचे सामर्थ्य देणारी माऊली म्हणजे सावित्रीबाई फुले. नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव. तेव्हा आई भवानी मातेची उपासना करूयाच. पण त्यासोबत सावित्रीबाईंचे स्मरण व्हावे. हाच विचार घेऊन संहिता क्रिएशन्सने खास व्हिडीओची निर्मिती केली आहे. यामध्ये अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी काम केले आहे. निर्माता आशीष पाथरे, लेखक अमोल मटकर, दिग्दर्शक अमोल जाधव आहेत. संहिता क्रिएशन्सच्या यूटय़ूब चॅनेलवर हा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.