सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापुरात शाहूपुरी भागात लोकांना पुरातून वाचवण्यासाठी बोट मागवण्यात आली होती. या बोटीच्या मदतीने लोकांना वाचवत असताना ती उलटली. या अपघातात बोटीमधील चारही जण बुडाले मात्र इतर लोकांच्या मदतीने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले






























































