केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट, आरबीआयसमोर पुन्हा कटोरा!

विकासदराने गेल्या 11 वर्षांतील गाठलेला नीचांक, महसुलात होणारी प्रचंड घसरण यामुळे खर्चाचा ताळमेळ साधणे कठीण बनले आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला असून, आता रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीपुढे पुन्हा कटोरा घेऊन जाण्याची वेळ आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून 35 ते 45 हजार कोटी रुपयांच्या अंतरिम लाभांशाची मागणी सरकारने केली आहे.

आर्थिक मंदीचा फटका सरकारला बसला आहे. रिझर्व्ह बँकेचा अतिरिक्त लाभांश दरवर्षी नको; पण यावर्षी अपवादात्मक स्थिती म्हणून हा लाभांश देण्यात यावा, असे सरकारचे म्हणणे असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.

1.48 लाख कोटी मिळणार; तरीही आणखी मागणी

  • रिझर्व्ह बँकेला चलन व्यवहार आणि सरकारी बॉण्डच्या ट्रेडिंगमधून नफा मिळतो. यातील काही नफा अतिरिक्त लाभांश म्हणून रिझर्व्ह बँक आपल्याकडे ठेवते. 2018-19च्या आर्थिक वर्षांत रिझर्व्ह बँकेने 1.23 लाख कोटी रुपयांचा नफा कमविला होता.
  • रिझर्व्ह बँकेच्या नफ्यामधून सरकारला किती वाटा मिळावा यासाठी माजी गव्हर्नर डॉ. विमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने ऑगस्ट 2019 मध्ये 1.76 लाख कोटी रुपये सरकारला हस्तांतर करण्यास मंजुरी दिली होती. यातील 1.48 लाख कोटी रुपये 2019-20 या चालू आर्थिक वर्षांत सरकारला मिळणार आहेत. मात्र, सरकारला चालू आर्थिक वर्षात आणखी 35 ते 45 हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून हवे आहेत. अंतरिम लाभांश म्हणून रिझर्व्ह बँकेने ही रक्कम द्यावी, असे सरकारचे म्हणणे आहे. अंतरिम लाभांशापोटी रकमेची मागणी करून एकप्रकारे सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे.

आर्थिक स्थिती बिकट

  • आर्थिक मंदीमुळे देशात सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मागणी कमी झाल्यामुळे उत्पादन घटले आहे. 2019-20 मध्ये जीडीपी अवघा 5 टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच वर्तविला आहे. गेल्या 11 वर्षांतील हा नीचांकी विकासदर आहे.
  • जीएसटीतून मिळणारे उत्पन्नही कमी होत आहे. त्यामुळे वित्तीय तूट वाढली आहे. ही तूट कमी करण्यासाठी सरकारला रिझर्व्ह बँकेकडून आणखी 35 ते 45 हजार कोटी रुपये हवे आहेत.
    बलुचिस्तानात दहशतवाद्यांचा हल्ला; 15 ठार
    बलुचिस्तानच्या क्वेटा मशिदीमध्ये नमाजादरम्यान दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी झाले.
आपली प्रतिक्रिया द्या