देशातील 9 लाख कोटी रुपयांएवढी बचत म्हणून जमा असलेली रक्कम खर्च झाल्याचे धक्कादायक वृत्त काही महिन्यापूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता आणखी एक वृत्त समोर आले आहे. ज्यानुसार देशातील जनतेकडे बचत व ठेवींच्या स्वरुपात असलेला पैसा हा आता निम्मा होत आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांनी ही माहिती दिली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात पात्रा यांनी याबाबत सांगितले.
”लोकांच्या ठेवींमध्ये कपात झाल्याने कुटुंबांची आर्थिक बचत कमी होत चालली आहे. साधारणत: आता लोकं आर्थिक बचतीपेक्षा घरांसारख्या भौतिक मालमत्तांकडे वळू लागले आहेत. कोरोना काळाच्या बचतीचा जो आकडा होता तो आता जवळपास निम्मा झाल आहे. आता लोकांकडे अर्धीच बचत शिल्लक राहिली असल्याचे ते म्हणाले.