कोरोनाने अडवला मुंबईकरांचा रस्ता… आठ दिवस घरातच बसा, सुरक्षित रहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘बेक्र दि चेन’ अंतर्गत 22 एप्रिल ते 1 मेपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या प्रवासावर बंधने आली असून पुढचे आठ दिवस घरातच थांबावे लागणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील लोकांना प्रवास करता येईल.

काय बंद

  • सामान्यांना मुंबई लोकल, मेट्रो, मोनो प्रवास
  • अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास
  • सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत.
  • इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱयांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱयांना काम करता येणार आहे.

काय सुरू

  • रिक्षा-टॅक्सी, बेस्ट व पालिकांची परिवहन सेवा, ओला-उबर सेवा
  • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने (सकाळी 7 ते 11 पर्यंत)
  • बँका, वित्तीय सेवा, दूरसंचार सेवा, टपाल सेवा
  • पेट्रोलपंप, बँकांचे एटीएम
  • लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय; परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड.