…तर सत्यजित तांबेंना निवडून आणण्यासाठी काम करणार – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला, तर त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीहून हेलिकॉप्टरने बीडकडे रवाना होण्यापूर्वी शिर्डी विमानतळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांची घेतली भेट घेतली. यावेळी तिळगुळ देऊन विखेंनी फडणवीसांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या, तर दोघांमध्ये काहीवेळ चर्चादेखील झाली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री विखे म्हणाले, सत्यजित तांबे यांच्या चर्चेबाबत त्यांनीच खुलासा केला पाहिजे. माझी त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. काँग्रेसच्या निष्ठा आणि इतर बाबतीत बाळासाहेब थोरात यांनी अनेकदा ज्ञान पाजळले आहे. उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील. त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरात घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.