सैराट फेम रिंकुचा कागर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सैराट या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करणारी रिंकू राजगुरूचा बहुप्रतिक्षित चित्रपट कागरचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रिंकूची प्रमुख भुमिका असून शुभांकर तावडेही असणार आहे. चित्रपट प्रेमकथा आणि राजकारणावर आधारित असल्याचे टीजरवरून दिसत आहे.

रिंकूचा अवतार सैराटमधील आर्चीसारखाच असल्याचा भास या टीजरमधून होतोय. या चित्रपटात रिंकूची भुमिका काय असेल यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. चित्रपटात शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भुमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केली असून २६ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रदर्शनाची तारीख बदलण्याची प्रेक्षकांची मागणी

चित्रपटाचा टीझर उत्तम आहे, परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलावी अशी मागणी प्रेक्षकांनी कमेंटद्वारे केली. २६ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु याच दिवशी मार्व्हलचा ऍव्हेंजर एंडगेम हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. यादिवशी कागरला थिएटर मिळतील का असा सवाल करत प्रेक्षकांनी प्रदर्शनाची तारीख बदलावी अशी मागणी केली आहे.