
सामना ऑनलाइन ,नवी दिल्ली
रिषभ पंत हा आक्रमक फलंदाज आहे. परिस्थितीची आणि स्वतःच्या खेळाची पर्वा न करता पंत धावा काढण्यावर भर देतो. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात त्याची कमतरता टीम इंडियाला नक्कीच जाणवेल, असं मत हिंदुस्थानचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी व्यक्त केलं. विश्वचषकासाठीच्या संघात रिषभ पंतला स्थान देण्यात आलं नाही. निवड समितीच्या या निर्णयावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी टीकाही केली होती. त्या पार्श्वभूमीवर अझरुद्दीन यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळेल असं वाटतं. तसेच हार्दिक पंडय़ाचा एक्स फॅक्टरही कामाला येईल. संघाकडे जसप्रीत बुमराहसारखे चांगले गोलंदाज आहेत, असेही अझरुद्दीन म्हणाले.



























































