Video – ऋषभ पंत स्वतःच्या पायावर उभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज ऋषभ पंतला स्वतःच्या पायावर उभा राहिलेला पाहून क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहिला. कार अपघातात झालेल्या दुखापतीमुळे पंत गेल्या काही महिन्यांपासून मैदानापासून दूर आहे. मात्र आता तंदुरुस्त होण्यासाठी तो घाम गाळताना दिसू लागला. त्याच्या तब्येतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होताना दिसत असून आता त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आता काठीशिवाय चालताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

गेल्या वर्षी ऋषभच्या कारला झालेल्या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याला आधार घेतल्याशिवाय चालता येत नव्हते, मात्र आज त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो कोणत्याही आधारशिवाय चालताना दिसत आहे. पंत सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असून दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेत आहे.