मुंबईतील प्रदूषण जिवावर उठतेय! हवेची घसरलेली गुणवत्ता आरोग्यासाठी घातक; माहीम ते कुलाब्यापर्यंत सकाळी धुरक्याचे साम्राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरातील वाढत्या प्रदूषणाने चिंता वाढवली आहे. प्रदूषण दिवसेंदिवस आरोग्यासाठी घातक असलेली पातळी गाठत आहे. माहिमपासून कुलाब्यापर्यंत सकाळच्या सुमारास प्रचंड धुरक्याचे साम्राज्य पसरत आहे. त्यात मुंबईकरांची घुसमट होत असून नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाही तर परिस्थिती भीषण बनेल, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

शहर व उपनगरांत मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. रस्ते काँक्रिटीकरणाची कामे संथगतीने सुरू आहेत. अशा ठिकाणांहून बाहेर पडणाऱ्या धुलीकणांनी शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हवेची गुणवत्ता आरोग्यासाठी घातक श्रेणीत नोंद होत आहे. रविवारी शहराच्या बहुतांश भागांतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) आरोग्यासाठी घातक म्हणून नोंद झाला. कुलाब्यातील न्यू नेव्ही नगरमध्ये अत्यंत घातक एक्यूआयची नोंद करण्यात आली. सुंदर नगर, आराम नगर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ का@लनी (196), माऊंट मेरी स्टेशन(188), मिठचौकी (197), म्हाडा का@लनी(186) अशा भागांतील एक्यूआयने चिंता वाढवली आहे. मागील आठवडाभरापासून हवेची गुणवत्ता ढासळली आहे.

तापमानवाढीने डोकेदुखीवाढली

सकाळी तीव्र प्रदूषणाचा सामना करणाया मुंबईकरांना दुपारी असह्य उकाडा हैराण करीत आहे. शहराच्या कमाल तापमानात रविवारी सलग दुस्रया दिवशी सरासरीपेक्षा तीन अंशांची वाढ झाली आणि सांताक्रूझमध्ये 35 अंश तापमान नोंदवले गेले. शनिवारी 36.3 अंश इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. प्रदूषणाबरोबरच उकाडयाचा ताप वाढल्याने अनेकजण डोकेदुखीने त्रस्त झाले आहेत.

जानेवारी-फेब्रुवारीत सकाळच्या सुमारास समुद्राकडून येणारे वारे स्थिर असतात. तापमान कमी अर्थात थंडावा असतो. वाऱ्यांची गती अत्यंत कमी असते. त्यामुळे हवेतील धूलीकण म्हणजेच प्रदूषित हवा दिर्घकाळ एकाच जागी स्थिरावते. परिणामी, धूलीकण लवकर इतरत्र विखुरत नाहीत. अकरा वाजल्यानंतर पश्चिमेकडून वारे वाहू लागल्यानंतर धुरक्याची तीव्रता कमी जाणवते.

n सुनील कांबळे, हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त अधिकारी