वावघर भागणेवाडीकडे जाणारा डांबरी रस्ता खचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वावघर गावातील भागणेवाडीकडे जाणारा डांबरी रस्ता पुर्ण खचल्याने वावघरातील ग्रामस्थांची रस्त्याअभावी गैरसोय झाली आहे. दापोली तालुक्यात रविवारपासून कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने वावघर गावातील भागणेवाडीकडे जाणारा डांबरी रस्ता पूर्ण खचला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची रस्त्याअभावी मोठीच गैरसोय झाली आहे.

दापोली तालुक्यात उन्हवरे भडवळे मार्गावरील वावघर गावातील भागणेवाडीकडे जाणारा डांबरी रस्ता आहे. या एकमेव असलेल्या रस्त्याचा वावघर गावातील भागणेवाडी, बांधाखालचीवाडी, फौजदारवाडी आणि भुवड वाडी या वावघरातील चार वाडयांना ये जा करण्यासाठी उपयोग होतो. मात्र, आता हा रस्ताच मधोमध 30 मिटर खचल्याने त्याचा फटका वावघरातील 4 वाडयांना बसला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची रस्त्याअभावी गैरसोय झाली आहे.