रॉबर्ट वढेरा यांची अटक तूर्त टळली, ईडी फास आवळण्याच्या तयारीत!

1328
robert-vadra

बिकानेर येथील जमीन खरेदी प्रकरण प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या चांगलेच अंगलटीस येणार आहे. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी राजस्थान हायकोर्टात झाली. त्यावेळी वढेरा यांच्या वकिलाने आणखी काही वेळ मागून घेतला. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) याला विरोध केला, पण जोधपूर येथील न्यायालयाने वढेरा यांना 22 दिवसांचा अवधी दिला. पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे. त्याचवेळी त्यांना व त्यांच्या भागीदारांना अटक होण्यावरही बंदी कायम ठेवली आहे. यामुळे वढेरा यांची अटक तुर्तास टळली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या