रॉबिन, वर्षाने जिंकली अर्ध मॅरेथॉन

216

दिल्लीच्या रॉबिन सिंगने जेतेपदाच्या हॅटट्रीकच्या प्रयत्नात असलेल्या ज्ञानेश्वर मोरगाला मागे टाकत आयडीबीय फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई अर्ध मॅरेथॉन 2019 स्पर्धेत जेतेपद मिळवले. रॉबिनने 21 किमी स्पर्धेत ज्ञानेश्वरपेक्षा दोन मिनिटे कमी वेळ नोंदवत 1ः11ः43 सेकंद या वेळेसह अव्वल स्थान पटकावले. मुंबईच्या वर्षा नामदेव भवारीने महिला गटात 1ः33ः38 सेकंद वेळेसह चमक दाखवली. स्पर्धेला बीकेसीच्या जिओ गार्डन्स येथून सुरुवात झाली.

18 हजारहून अधिक धावपटूंनी तीन वेगवेगळ्या गटात सहभाग नोंदवला होता. सकाळी पाऊस आल्यानंतरही धावपटूंमधील उत्साह कमी झाला नव्हता. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर सचिन तेंडुलकरने मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला व विजेत्यांना पुरस्कारदेखील दिला.

इथिओपियाचा अबेरा सातारा मॅरेथॉनचा विजेता

सातारा- चाळीसहून अधिक परदेशी धावपटू आणि देशभरातील आठ हजारांहून अधिक धावपटूंचा सळसळता उत्साह… भल्या पहाटेचे आल्हाददायक वातावरण… यकतेश्कर घाटातील धबधबे… रस्त्यावर आलेले ढग… दुतर्फा हिरव्या शालूने नटलेला मार्ग… अशा प्रसन्न आणि उत्साही वातावरणात रविवारी पार पडलेल्या आठव्या सातारा हिल अर्ध मॅरेथॉनमध्ये यंदाही अपेक्षेप्रमाणे इथिओपिया व केनियाच्या धावपटूंचा बोलबाला बघायला मिळाला. पुरुष अर्ध मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या फिक्रू अबेरा दादीने बाजी मारली, तर केनियाच्या मर्सी जेलिमो टू हिने महिला अर्ध मॅरेथॉन जिंकण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानी गटात पुरुषांमध्ये संभाजीनगरच्या प्रल्हाद धनावतने प्रथम क्रमांक पटकाविला, महिलांमध्ये स्वाती गाढवे हिने शर्यत जिंकली.

आपली प्रतिक्रिया द्या