बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासाजवळ रॉकेट हल्ला, एक जखमी

491

इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासाजळ रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. दूतावासाजवळ पाच रॉकेट हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पहिल्यांदा अमेरिका दूतावासावर थेट हल्ला करण्यात आला आहे. यापूर्वीही दूतावासाजवळ रॉकेट हल्ले करण्यात आले होते. जिथे अमेरिकन सैनिक होते तिथे हे हल्ले करण्यात आले होते. सर्व हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

रविवारी रात्री दुतावासाच्या कॅफेटेरियामध्ये एक रॉकेट पडला. तर अजून दोन रॉकेट त्याच परिसरात पडले. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. हा व्यक्ती अमेरिकेचा सैनिक आहे की इराकचा नागरिक आहे ही बाब अजून स्पष्ट झालेली नाही. तसेच त्याच्या प्रकृतीबद्द्लही माहिती कळालेली नाही.  अमेरिकेच्या दूतावासानेही याबबात काही माहिती दिलेली नाही.

इराकचे पंतप्रधान अदेल अब्द्ले मेहदी आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद इलबसी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच इराकला युद्धभुमी बनवू नका असेही त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या