
स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर तब्बल 13 महिन्यांनंतर टेनिस कोर्टवर उतरला. सर्वाधिक 20 ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱया या पठ्ठय़ाने डॅनिएल इवांसला 7-6, 3-6, 7-5 अशा फरकाने पराभूत करीत झोकात पुनरागमन केले.
39 वर्षीय रॉजर फेडरर गुडघ्यावर झालेल्या शस्त्र्ाक्रियेमुळे टेनिसपासून दूर होता. 405 दिवसांनंतर पहिला सामना खेळणाऱया रॉजर फेडररने आपल्यामधील धमक अजूनही कमी झालेली नाही हे समस्त टेनिसप्रेमींना यावेळी दाखवून दिले आहे.






























































