सोशल मीडियावरून रोहिणी खडसेंनी हटवला नाथाभाऊंचा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी करणार आहेत. येत्या काही दिवसात त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार असं स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यातच रोहिणी खडसेंनी आपल्या सोशल मीडिया पेवकरून एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला आहे.

एकनाथ खडसेंनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणी खडसेंनी आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होते. रक्षा खडसे विद्यमान खासदार आणि आता रावेर लोकसभेच्या भाजप उमेदवार आहेत. आता सासरा आणि सून एक पक्षात तर कडील आणि मुलगी वेगवेगळ्या पक्षात असणार आहेत. यामुळे रोहिणी खडसे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून एकनाथ खडसे यांचा फोटो हटकला आहे.